12:30 PM
उत्कर्ष विद्यालय, जुने विवा कॉलेज, एम.बी. इस्टेट रोड, विरार
उत्कर्ष विद्यालय, प्राथमिक विभाग
11:00 AM
टीमा सभागृह, बोईसर पश्चिम
03:00 PM
सर्व जुन्या (शैक्षणिक वर्ष २०१९ - २० पर्यंत जे उत्कर्ष विद्यालय मराठी माध्यमात शिकत असलेले) विद्यार्थी व पालकांना हि विनंती आहे त्यांनी कृपया ऑनलाईन फॉर्म भरू नये. ऑनलाईन फॉर्म फक्त नवीन (दुसऱ्या शाळेत शिकत होते) विद्यार्थ्यांसाठी जे (शैक्षणिक वर्ष २०२० - २१) मध्ये आपल्या शाळेत प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी आहे. तसेच ज्या पालकांनी नोव्हेंबर ते मार्चमध्ये एडमिशन फॉर्म शाळेत जमा केले आहेt त्यांनीही पुन्हा ऑनलाईन फॉर्म भरू नये. कृपया कोणीही एडमिशनसाठी शाळेत जाऊ नये.
सद्य परिस्थितीत पाहता शाळेच्या सर्व घटकांच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या सर्व घटकां च्या विचार विनिमयाने प्रत्यक्ष शाळा जून महिन्यात सुरू होणार नाही. प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याबाबत सूचना पालकांना व विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात ( जुलै पहिल्या आठवड्यात) दिल्या जातील . पालकांनी सूचनेची नोंद घ्यावी. मुख्याध्यापिका टिप _ whatsapp group द्वारे अभ्यास सुरू राहील.सर्व बालमित्रांनी व पालकांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती . धन्यवाद
महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा निकाल mpsp च्या वेबसाईट वर उद्या 27 मे रोजी सायंकाळी 4 वाजल्या नंतर दिसणार आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी mpsp.co.in. या वेबसाइटवर पाहणे
1]रुमालापासून मास्क बनवणे..* https://youtu.be/6vydY3L2lE0 *2]फुग्याचा प्रयोग..* https://youtu.be/i-axuxsa5H4 *3]सुंदर कागदकाम..* https://youtu.be/1IySWxRsm0U *4]ग्रिटिंगकार्ड बनवणे..* https://youtu.be/15CqwvdDY6Y *5]बोटबाहूल्या बनवणे..* https://youtu.be/2VFO_wrLIoI *6]मुळाक्षर सिडीज..* https://youtu.be/S8J9EvII0Dc *7]कागदापासुन ससा बनवणे..* https://youtu.be/I0nm2gCEX1c *8]कपापासुन आकाशकंदिल..* https://youtu.be/mv5RKY5aH94 *9]कॅरीबॅगपासून गजरा निर्मिती..* https://youtu.be/nQH1RMRZwzc *10]बहूपदेश झाड..* https://youtu.be/SEBhJT5puT4 *11]चाॅकलेटकव्हरपासुन फुलपाखरु..* https://youtu.be/YcIik_CJRyU *12]गुलाबफुल बनवणे..* https://youtu.be/YO8qZ3Bwp-U *13]टोपी बनवणे..* https://youtu.be/EgTvg-iEvvY *14]मॅजिक बाॅल बनवणे.* https://youtu.be/uQ_QoU6A67A *15]तिरंगा बॅच..* https://youtu.be/9m71bnafHgc *16]कागदी भिरभिरे..* https://youtu.be/pWaC6t_6ou8 *17]कागदी बेडूक..* https://youtu.be/kTTymnQhcBo
दि.१३ एप्रिल २०२०, सोमवार शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - १) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो! कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा! सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे आपल्या शाळा बंद आहेत. परीक्षा रद्द झाल्या आहेत.पण मला खात्री आहे की शालेय अभ्यासाच्या पलीकडे जाऊन तुमचं शिकणं चालू असेलच! आपण सतत काही ना काही तरी शिकतच असतो.पण या सततच्या शिकण्याला आपण शालेय अभ्यासाची जोड दिली तर...? तर हे अभ्यासपालिकडचं शिकणं अधिक समजपूर्वक आणि सखोल आणि विस्तृत होऊ शकतं हा आमचा अनुभव आहे. म्हणूनच या लॉकडाऊन(बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही यापुढील काळात रोज आपल्यासाठी घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा. https://bit.ly/dikshadownload त्यानंतर आपल्याला आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये व्हाट्स अपवर आलेल्या सुचनेतील विषयनिहाय पाठनिहाय लिंकना टच करून तो पाठ पहायचा किंवा स्वाध्याय सोडवायचा आहे. चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास! आजचा विषय-मराठी इयत्ता-पहिली पाठ-वाचनपाठ-४ https://bit.ly/2JXoHKU इयत्ता-दुसरी पाठ-फुग्या रे https://bit.ly/2VhC9hO इयत्ता-तिसरी पाठ-ट्राफिकदादा https://bit.ly/34tZeCk इयत्ता-चौथी पाठ-आभाळमाया https://bit.ly/2Vka0H4 इयत्ता-पाचवी पाठ-पाण्याची गोष्ट https://bit.ly/2RO4qfl इयत्ता-सहावी पाठ-नवा पैलू https://bit.ly/2V4FfqB इयत्ता-सातवी पाठ-कोळीण https://bit.ly/2XtWZ0b इयत्ता-आठवी पाठ-गे मायभू https://bit.ly/34COCkz इयत्ता-नववी पाठ-वनवासी https://bit.ly/2ycpW6c यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो. Stay home, stay safe! अभ्यासासाठी शुभेच्छा! आपला श्री. दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
सर्व पालकांना व विदयार्थ्यांना कळविण्यात येते की विद्यार्थ्यांना देण्यात आलेली पाठयपुस्तक जपून ठेवा निकाल देताना जमा करून घेण्यात येईल ,तसेच जितक्या विषयाच्या पाठयपुस्तक असतील तेवढीच पाठयपुस्तक मिळतील .जुन्या वह्या जपून ठेवा , त्यातील कोरी पाने पुढील वर्षी वापरता येतील .कारण पाठयपुस्तक व वह्या यांची छपाई पूर्ण बंद आहे . शाळा सुरू झाल्यावर लगेच उपलब्ध होणार नाही याची पालकांनी नोंद घ्यावी . तसेच आजूबाजूला असणाऱ्या पालकांना संदेश पाठवून जागृती निर्माण करावी .
सर्व पालक व विद्यार्थी यांना अत्यंत महत्त्वाची सूचना मराठी व इंग्रजी माध्यम शिशुवर्ग ते आठवी पर्यंत (Nursery to 8th std) यावर्षी होणारी द्वितीय सत्रांत परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. शाळेसंदर्भीतील पुढील सूचना १५/४/२०२० नंतर देण्यात येतील. सर्वांनी काळजी घ्या. मुख्याध्यापिका उत्कर्ष विद्यालय विरार (प.)
दीपावलीची सुट्टी दि. २४/१०/२०१९ ते १२/११/२०१९ अशी राहिल. बुधवार दि. १३/११/२०१९ पासून नेहमी प्रमाणे शाळा भरेल. सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना दीपावीच्या हार्दिक शुभेच्छा.
गणेशोत्सवा निमित्त सोमवार दि. २/९/२०१९ ते शनिवार दि. ७/९/२०१९ पर्यंत शाळेला सुट्टी राहिल. सोमवार दि. ९/९/२०१९ पासून नेहमी प्रमाणे शाळा भरेल. गणेशोत्सावाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! गणपती बप्पा मोऱ्या‼ मुख्याध्यापिका
सोमवार दि. ५/०८/२०१९ रोजी अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे शाळेला सुट्टी आहे. शनिवारी दि. ३/०८/२०१९ चा मंगळवार दि. ६/०८/२०१९ रोजी होईल व सोमवार दि. ५/०८/२०१९ चा पेपर बुधवार दि. ७/०८/२०१९ होईल. मुख्याध्यापिका
शनिवार दि. ०३-०८-२०१९ ला घेण्यात येणारा इ. १ली व २री चा गणित व इंग्रजीचा पेपर आणि 3रा व 4थी चा गणित व परिसर १ चा पेपर मंगळवार दि.०६-०८-२०१९ रोजी घेण्यात येईल. कृपया पालकांनी याची नोंद घ्यावी. मुख्याध्यापिका
ऑडिशन.. ऑडिशन... ऑडिशन.... मराठी शाळा प्रतिष्ठान आयोजित मातृभाषातून शिक्षण हेच प्रगतीचे लक्षण* मराठी शाळा टिकवण्यासाठी बालनाट्याच्या माध्यमातून प्रयत्न करणारे प्रसिद्ध लेखक,दिग्दर्शक रमेश वारंग यांच्या मराठी शाळा टिकवण्यासाठी, ऍड जिंगल व युट्युब फिल्म मध्ये काम करण्यासाठी 5 ते 16 वयोगटातल्या बाल कलाकारांनी, व तरुण, प्रौढ कलाकारांनी त्वरित फोटो आणि संपुर्ण माहिती त्वरीत व्हाट्सअप्प करावी, लवकरच ऑडिशन साठी बोलवलं जाईल... “चला आमच्या सोबत जोडले जा मराठी शाळा टिकविण्यासाठी” संपर्क : 7718082329 / 9323444098
अतिवृष्टीमुळे आज मंगळवार दि. २-७-२०१९ शाळेला सुट्टी राहील.
आपली शाळा मतदान केंद्र असल्यामुळे वार्षिक परीक्षेच्या निकालाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे याची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावी. वार्षिक परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. २६/०४/२०१९ रोजी स. १०.३० ते दु. १२.०० या वेळेत जाहिर केला जाईल. येताना सोबत प्रथम व द्वितीय सत्राच्या फी पावत्या घेऊन येणे.
वसई कला क्रीडा स्पर्धा २०१८ मधील सहभागी विद्यार्थ्यांनी गुरुवार दि. २७-१२-१२०१८ ते सोमवार दि.३१-१२-२०१८ या कालावधीत दिलेल्या सूचने प्रमाणे स्पर्धेच्या ठिकाणी पालकांसोबत उपस्थित रहाणे.
सर्व नागरिकांना कळकळुन विनंती आहे आपल्या कडे सर्व भारतात, प्रत्येक शहरात, प्रत्येक तालुक्यात, आणि प्रत्येक गावात, आणि शहरातील व गावातील प्रत्येक शाळेत अगदी मोफत शासकीय आरोग्य विभागातर्फे measles + rubella लस मोहिम येत्या 14 November 2018 ला सुरु होत आहे. तरी प्रत्येक नागरिकांनी फक्त शासनाची किंवा आरोग्य विभागाचिच जबाबदारी न समजता तुमचं गाव, तुमचं शहर, आपल्या कुटुंबातील मूलं ही सामाजिक संकल्पना मनात ठेऊन आपल्या गावातील व शहरातील प्रत्तेक बालकांना हवेतुन पसरणाऱ्या रोगापासून ही लस देऊन त्यांना संरक्षण देता येईल या साठी प्रयत्न करुन आमच्या आरोग्य विभागाच्या मोहीमेत सामिल व्हा ही विनंती. आपल्या कडे एखाद्या चांगल्या मोहीमेची सुरुवात होण्या अगोदर "अफवा" ह्या हवेतून पसारणाऱ्या जंतुपेक्षा अधिक वेगाने आधी पोहचतात. तरी आपण सगळे सुशिक्षित असून ह्या लसी बद्दल तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पालकांच्या मनात गैरसमज असतील तर त्यांची समजूत घालून त्यांना लस घेऊन बालकांना सुरक्षित करण्यास सांगा. ही लस "9 महीने ते 15 वर्षा" पर्यंत च्या बालकांना द्यावयाची आहे म्हणजेच प्रत्तेक "10 वी " तील विद्यार्थ्यांना compulsorily द्यावयाची आहे (सुरक्षितता) : - M/R लस अत्यंत सुरक्षित आहे, Safe आहे घाबरण्याचे कारण नाही. 1) आता पर्यंत 9 कोटी 60 लाख बालकांना भारतात हि लस दिली गेलेली आहे. 2) आतपर्यंत 9 राज्यांमध्ये हि M/R ची मोहीम राबविली गेली आहे .कोणत्याच बाळाला काहीही झालेले नाही. 3) हि लस 10 डोसेस ची असणार आहे. 4) हि मोहीम 5 आठवडे चालणार आहे. 5) तसेच ही लस AD सिरिंज द्वारे दिलि जाते ही सिरिंज एकदा वापरात आल्यावर आपोआप lock होऊन त्या सिरिंज चा वापर पुन्हा करता येत नाही. ही सिरिंज फक्त "गवर्नमेंट हॉस्पिटल" येथेच उपलब्ध असून तुमचे बाळ अधिक कसे सुरक्षित राहिल याची अधिक काळजी घेतली जाते. हा अजार झाल्यास होणारे विपरीत परिणाम ( लक्षण) : - जर गर्भवती मातेला गोवर झाल्यास तिच्या होण्याऱ्या बाळास हा आजार होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्या बाळास खालील आजार होण्याची दाट शक्यता असू शकते. 1) बाळाचा मेंदू छोटा असू शकतो. 2) बाळ जन्मताच अपंग असू शकते. 3) बाळाचे डोळे तिरपे तसेच डोळ्यात टिक असू शकते. 4) बाळाला M/R लस न दिल्यामुळे संपूर्ण भारतात 50,000 बालके मृत्यू पावतात. 5) बाळास आंधळेपणा सुद्धा येऊ शकतो. डॉ.दयानंद सुर्यवंशी जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर
दर वर्षी प्रमाणे या वर्षीची पायाभूत परीक्षा दि. 28 - 8 -2018 ते 30 -8 -2018 या कालावधीत घेण्यात येईल. परीक्षा कालावधीत इ. 1ली ते 4थी साठी शाळेची वेळ दु.12.30 ते 3.00 अशी राहील. याच कालावधीत इ. 2री ते 4थी ची परीक्षा घेण्यात येईल व इ.1ली चे वर्गात तास होतील. पायाभूत परीक्षेचे वेळापत्रक मंगळवार दि.28-8-18 - मराठी (इ. 2री, 3री व 4थी) बुधवार दि. 29-8-18 - गणित (इ. 2री, 3री व 4थी) गुरुवार दि. 30-8-18 - इंग्रजी (इ. 3री व 4थी)
उद्या गुरुवार दि. ९/८/२०१८ रोजी ‘आदिवासी दिन’ असल्यामुळे शाळेला सुट्टी राहील. उदया होणारा पेपर शनिवार दिनांक 11/8/2018 रोजी सकाळी 11 ते 2.00 या शाळेच्या वेळात घेण्यात येईल. तसेच शनिवारी होणारे ग्रेड 1 व 2 चे वर्ग होणार नाहीत . विद्यार्थ्यांनी सकाळी 11 वाजता पेपर साठी येणे. शुक्रवारी होणारा पेपर परीक्षेच्या दिलेल्या वेळापत्रकानुसार होईल.
आज दि. ९ जुलै २०१८ अतिवृष्यीमुळे शाळा बंद राहील.
आज दि. २५ जून २०१८ पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाला अतिवृष्टीमुळे शाळेला सुट्टी राहील.
विज्ञान व कार्यानुभव प्रदर्शनाचे निमंत्रण नमस्कार! आपल्या वि. वा. ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे, उत्कर्ष विद्यालयात शुक्रवार दि.०९/०२/२०१८ व शनिवार दि. १०/०२/१८ रोजी शाळा स्तरावर विज्ञान व कार्यानुभव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन, त्यांच्या सृजन व संशोधक वृत्तीचा विकास करणे हाच या प्रदर्शनामागील आमचा हेतू आहे. आपल्या पाल्यासोबत आपण विज्ञान प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी व आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण. ठिकाण - उत्कर्ष विद्यालय,विवा कॅालेज जुनी इमारत, रूम नं २१०, दुसरा मजला विज्ञान व कार्यानुभव प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना १० पैकी गुण देण्यात येतील. यासाठी विज्ञान प्रदर्शन पाहिल्यानंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहून तो कागद विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाजवळ ठेवलेल्या पेटीत व्यवस्थीत घडी करून ठेवावा. प्रदर्शन पहायला येताना दिलेली वेळ पाळा व गर्दिचा त्रास टाळा. मुख्याध्यापिका प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी वेळ शुक्रवार दि. ०९/०२/२०१८ शनिवार दि. १०/०२/२०१८ इयत्ता ४थी झाशी,अहिल्या,जिजाई दुपारी. १२.०० ते २.०० इयत्ता १ली व २री झाशी,अहिल्या,जिजाई इयत्ता ३री झाशी,अहिल्या,जिजाई दुपारी. २.०० ते ४.०० दुपारी. ११.०० ते १.०० टिप - प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या पूर्ण गणवेशात येणे.
वि.वा. ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे,उत्कर्ष विद्यालय,विरार ( प.) प्राथमिक विभाग ( इ.१ ली ते ४ थी ) (मराठी माध्यम) शालेय सहल – २०१७ – २०१८ सहलीचे ठिकाण:- ‘कल्याणी फार्म हाऊस’ वेळ:- सकाळी ७.३० ते संध्या. ५.३० बुधवार दि. १०/०१/२०१८ रोजी इ. १ली ते ४थी च्या वर्गांना सुट्टी राहील. गुरुवार दि. ११/०१/२०१८ रोजी इ. १ली ते ४थी च्या वर्गांना सुट्टी राहील. * सहलीच्या दिवशी कोणीही उशिरा येऊ नये. * सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहलीच्या दिवशी पूर्ण गणवेषात येणे. आयकार्ड घालणे अनिवार्य रहील. पायात मात्र सॅण्डल घालणे. बूट व मोजे घालू नयेत. सोबत येताना वॉटरबॅग, मोठा टॉवेल. जादा ड्रेस (पाण्यात भिजण्यासाठी), प्लास्टिक पिशवी आणणे. विद्यार्थ्यांच्या बॅगेवर विद्यार्थ्यांच्या नावाचे लेबल लावणे. मुख्याध्यापिका
सस्नेह नमस्कार उद्या शनिवार दिनांक १६ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या प्राथमिक विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी आपल्या बालगोपाळाचे कौतुक करण्यासाठी , त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे . वेळ_ दुपारी ३.०० स्थळ _ विवा रंगायतन ( विवा महाविद्यालय जुनी इमारत)
शालेय क्रीडा महोत्सव - २०१७ - १८ स्पर्धाचे वेळापत्रक प्राथमिक विभाग दिनांक वार इयत्ता स्पर्धाप्रकार वेळ ठिकाण २७-११-२०१७ सोमवार १ ली व २ री धावणे ,चमचा लिंबू ,लंगडधाव स.६.४५ ते स. १०.०० विवा मैदान ३ री ४ थी धावणे ,लंगडधाव ,संगीतखुर्ची २८-११-२०१७ मंगळवार १ ली व २ री संगीतखुर्ची ,बादलीत चेंडु ,बटाटाशर्यत स.६.४५ ते स. १०.०० विवा मैदान ३ री व ४ थी लंगडी ,कबड्डी ,रस्सीखेच ,लगोरी टिप :- वरील स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी डबा , वॉटरबॅग व शाळेच्या गणवेषात स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ६.४५ वा. हजर राहणे. आपल्या पाल्यांना घेवून जाण्यासाठी पालकांनी सकाळी ठीक - १०.०० वाजता हजर राहणे. बुधवार दि. २९/११/२०१७ पासून नेहमी प्रमाणे शाळा. मुख्याध्यापिका
अतिवृष्टीमुळे शाळेला आज दि. २० - ९ - २०१७ सुट्टी राहील.
वि. वा. ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे, उत्कर्ष विद्यालय, विरार. Students Details update Student Name Std - Div. - Roll No. Mother's Name Gender - F / M Aadhar No. Date of Birth (DD/MM/YY) Religion Category BPL - Yes / No Student's Bank Details Ifsc Bank Name Branch Name Account No. टिप - • विद्यार्थ्यांचा बँक अकाऊँट क्रमांक टाकणे, पालकांचा नाही. विद्यार्थ्याचे बँकेत खाते नसल्यास त्वरीत खाते उघडणे. (Nationalised Bank मध्ये) राष्ट्रीयकृत बँका. • हा फॉर्म मंगळवार दि. २२/८/२०१७ पर्यंत वर्गशिक्षकांकडे जमा करणे. • ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही त्यांनी त्वरीत आधार कार्ड काढणे अन्यथा सरकारी सरल प्रणालीसाठी विद्यार्थ्यास ग्राह्य धरले जाणार नाही. मुख्याध्यापिका
पालकांसाठी अत्यंत महत्वाची सूचना शासनाकडून आपल्या शाळेचे सर्वेक्षण दि.१३/९/१७ ते १६/९/१७ या कालावधीत होणार आहे. या सर्वेक्षणात आपल्या मुलांच्या शै. प्रगतीचे मूल्यमापन व प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची तपासणी होणार आहे. या सर्वेक्षणासाठी प्रत्येक मुलाच्या आधारकार्डची झेरॉक्स शासनाकडे जमा करावयाची आहे. सर्व पालकांनी मंगळवार दि. १२/९/२०१७ पर्यंत त्वरीत आपल्या पाल्याच्या आधार कार्डची झेरॉक्स वर्गशिक्षकांकडे जमा करावयाची आहे. आधारकार्ड नसल्यास शाळेतील प्रवेश गृहीत धरला जाणार नाही याची पालकांनी नोंद घ्यावी. मुख्याध्यापिका
पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाला गणेशोत्सवा निमित्त शुक्रवार दि. २५/८/२०१७ ते गुरुवार दि. ३१/८/२०१७ पर्यंत शाळेला सुट्टी राहील. शुक्रवार दि. १/९/२०१७ पासून शाळा नेहमी प्रमाणे भरले. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या संस्थेच्या सन्मा. सदस्या, माजी सहसचीव व मार्गदर्शिका सन्मा. सौ. भारती देशमुख मॅडम यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सर्व पालक व विद्यार्थी यांना अत्यंत महत्त्वाची सूचना मराठी व इंग्रजी माध्यम *शिशुवर्ग ते आठवी पर्यंत* *(Nursery to 8th std)* यावर्षी होणारी द्वितीय सत्रांत परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे.त्याचप्रमाणे *शाळेसंबंधी व निकाल पत्रक सबंधी पुढील सूचना मे महिन्यात देण्यात येतील.* *Stay Home & stay safe* सर्वांनी काळजी घ्या. आदेशानुसार उत्कर्ष विद्यालय विरार (प.)
शैक्षणिक वर्ष २०१८ - १९ साठी प्रवेश प्रक्रिया २ नोव्हेंबर २०१७ पासून सुरू होत आहे. प्रवेशा संबंधी माहितीसाठी प्रवेश टॅब व फोटो गॅलेरी पाहणे.