प्रबळ  इच्छाशक्ती  आणि  आत्मविश्वास यांच्या सुरेख संगमातून उभारलेली वास्तू म्हणजेच आपले ज्ञानमंदिर उत्कर्ष विद्यालय.
वि.वा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय आमदार श्री.हितेंद्रजी ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने १८ जुलै १९८९ साली गुरूपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर ‘उत्कर्ष विद्यालय’ या ज्ञानमंदिराचा शुभारंभ केला.
     अगदी लहानशा जागेत व मोजक्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने सुरू केलेल्या या शाळारूपी रोपट्याने आज वटवृक्षाचे रूप धारण केले आहे.
शाळेला लाभलेला पालकांचा उदंड प्रतिसाद, विश्वास, प्रेम व आशीर्वाद यामुळेच आपली शाळा आज उत्कर्षाच्या शिखरावर आपले स्थान कायम टिकवून आहे.
सतत विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाचा विचार करणारे सन्माननीय आमदार श्री. हितेंद्रजी ठाकूर यांच्या दूरदर्शीपणामुळे आपली शाळा विविध उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे.