अधिक वाचा  
विज्ञान व कार्यानुभव प्रदर्शनाचे निमंत्रण
नमस्कार!
आपल्या वि. वा. ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे, उत्कर्ष विद्यालयात शुक्रवार दि.०९/०२/२०१८ व शनिवार दि. १०/०२/१८ रोजी शाळा स्तरावर विज्ञान व कार्यानुभव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन, त्यांच्या सृजन व संशोधक वृत्तीचा विकास करणे हाच या प्रदर्शनामागील आमचा हेतू आहे.
आपल्या पाल्यासोबत आपण विज्ञान प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी व आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण.
ठिकाण - उत्कर्ष विद्यालय,विवा कॅालेज जुनी इमारत, रूम नं २१०, दुसरा मजला
विज्ञान व कार्यानुभव प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना १० पैकी गुण देण्यात येतील. यासाठी विज्ञान प्रदर्शन पाहिल्यानंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहून तो कागद विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाजवळ ठेवलेल्या पेटीत व्यवस्थीत घडी करून ठेवावा. प्रदर्शन पहायला येताना दिलेली वेळ पाळा व गर्दिचा त्रास टाळा.
मुख्याध्यापिका
प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी वेळ
शुक्रवार दि. ०९/०२/२०१८ शनिवार दि. १०/०२/२०१८
इयत्ता ४थी झाशी,अहिल्या,जिजाई दुपारी. १२.०० ते २.०० इयत्ता १ली व २री झाशी,अहिल्या,जिजाई
इयत्ता ३री झाशी,अहिल्या,जिजाई दुपारी. २.०० ते ४.०० दुपारी. ११.०० ते १.००
टिप - प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या पूर्ण गणवेशात येणे.